Chandrakant Patil |"सावरकरांनी 1940 मध्येच फाळणीचं भाकीत वर्तवलं होतं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant dada Patil

"सावरकरांनी 1940 मध्येच फाळणीचं भाकीत वर्तवलं होतं"

चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज बोलून दाखवली. केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित लिखित वीर सावरकर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी एखादा विचार हाणून पाडायचा असेल तर, काही शक्ती त्यासाठी एकजूटीने काम करत असल्याचं पाटील यांनी म्हटलं. दुर्दैवाने यामध्ये काही माध्यमातल्या शक्तींचाही सहभाग असल्याचं ते म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

ज्यांना लांगूल चालनाचं सरकार आणायचं आहे, ज्यांना तरुण पिढीपर्यंत हे विचार पोहोचू द्यायचं नाहीत, एखादा विषय हाणून पाडण्यासाठी हे लोक कायम तत्पर असतात. आणि काही प्रमाणात माध्यमे त्याला सहकार्य करतात. तरुण पिढीपर्यंत ऐतिहासिक संदर्भ, फॅक्ट्स पोहोचवले जात नाहीत. तरुणांना हे जाणून घ्यायचंय, मात्र त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या जात नाहीत,. सावरकरांचा विचार चिरंतन असल्याने त्याबद्दल तरुण आग्रही होतील, आणि राज्यकर्त्यांना जाब विचारतील, त्यामुळे सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.

या प्रकाशन सोहळ्यात बोलताना, पाटील यांनी प्रशांत पोळ यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत, 'सावरकरांनी फाळणीचं चाळीस सालीच भाकीत व्यक्त केलं होतं,' असा उल्लेख केला. सावरकरांविषयी सगळे विषय तरुण पिढीला जवळ आणतायेत, असं ते म्हणाले. पाकिस्तान आपला शत्रू नसून चीन आहे, हे देखील या पुस्तकाता सांगितल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

शिवसेनेला टोला?

प्रकाशन सोहळ्याच्या भाषणात बोलताना महाराष्ट्रातील विचारधारांबद्दल पाटील यांनी मत व्यक्त केलं. राज्यात दोन प्रकारच्या विचारधारा असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्यावर 400-500 वर्षे राज्य केलेल्या मुसलमानांचं या देशावर राज्य आहे की नाही, असं म्हणणाऱ्या लोकांची एक विचारधारा आहे. 5000 वर्षे राज्य करणाऱ्या हिंदूंबद्दल त्यांना महत्व वाटत नाही, असे ते म्हणाले. तर आपला आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास मांडणारी आणखी एक विचारधारा आहे. हिंदूंच्या राजकीय विचारधारेत दोन पक्ष होते. त्यातील एक पक्ष सध्या तळ्यात-मळ्यात आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

loading image
go to top