esakal | शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रकांत पाटलांचे अमित शहांना साकडं
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रकांत पाटलांचे अमित शहांना साकडं

sakal_logo
By
मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे बुधवारी केली.

हेही वाचा: ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’मध्ये शुक्रवारपासून ‘सुगरण’ योजना

पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदन साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर यांनी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची त्यांनी विनंती केली. तिची दखल घेत पाटील यांनी गृहमंत्री शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘शनिवारवाडा बाजीराव पेशवे यांनी १७३१ मध्ये बांधून पूर्ण केला. या वाड्यातून पेशव्यांनी सुमारे ८५ वर्षे देशातील बहुतांश भागावर नियंत्रण प्रस्थापित करून राज्य कारभार केला. या वाड्याचे महत्त्व कमी करण्यासाठी इंग्रजांनी १८१८ नंतर येथे भाजी मंडई केली. तसेच मनोरुगण कैद्यांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला. १८२८ मध्ये या वाड्याला आग लावण्यात आली. ती सात दिवस धुमसत होती. त्यात शनिवारवाड्याचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला.

हेही वाचा: अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू

हजारी कारंजाचे काही अवशेष आजही दिसतात. नगारखाना, ३०० वर्षांपूर्वीचा दरवाजा, मराठी चित्रशैली आदी शनिवारवाड्याची ओळख आता पुसट होऊ लागली आहे. त्यामुळे त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शनिवारवाडा हे निवासस्थान होते. त्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनुरूज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.

loading image
go to top