esakal | ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’मध्ये शुक्रवारपासून ‘सुगरण’ योजना
sakal

बोलून बातमी शोधा

sugaran

‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’मध्ये शुक्रवारपासून ‘सुगरण’ योजना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरोघरच्या सुगरणींसाठी ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ एक खास पर्वणी घेऊन येत आहे. खाद्यपदार्थ व आरोग्य या विषयांशी संबंधित विविध गोष्टींची माहिती असणाऱ्या ‘सुगरण’ या विशेष सदराचा ‘श्रीगणेशा’ येत्या शुक्रवारी (ता. दहा) होत आहे. महिलांसाठी या सदरावर आधारित कूपन बक्षीस योजना असून, भरघोस बक्षिसांची पर्वणीही त्याबरोबर असणार आहे.

तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षाही जास्त बक्षिसांची लयलूट या योजनेत असणार आहे. एलईडी स्मार्ट टीव्हीचे बंपर बक्षीस हे विशेष आकर्षण आहे. त्याचबरोबर रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हनसह इतरही बक्षिसांची लयलूट असणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बॉस कंपनीची वॉटर बॉटल मिळणार आहे.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

महाराष्ट्र आणि गोव्यातल्या सर्व महिलांसाठी ही योजना खुली राहणार आहे. येत्या शुक्रवारी (ता. दहा) सुरू होणारी ही योजना नव्वद दिवस सुरू राहणार आहे.

११ डिसेंबरला तिची सांगता होईल. ‘सकाळ’ आणि ‘अॅग्रोवन’ अंकातील सदर वाचून, प्रश्नांच्या उत्तराचे कूपन (योजनेसाठी खास प्रसिद्ध होणाऱ्या पानावर) चिकटवून ती २५ डिसेंबरपर्यंत नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे मिळणार आहेत. याबाबत सविस्तर सूचना नंतर प्रसिद्ध केल्या जातील. नव्वद दिवस चालणाऱ्या या योजनेत नव्वदपैकी कोणत्याही ऐंशी बरोबर उत्तरांची कूपन्स बक्षिसासाठी ग्राह्य धरली जातील. निवडक विजेत्या महिलांना ‘साम सुगरण’ ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

सेलिब्रिटी शेफ आणि ‘मधुराज रेसिपी’मुळे प्रसिद्ध असलेल्या मधुरा बाचल या योजनेच्या ब्रँड अँबेसेडर आहेत. आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधून ‘सकाळ’ किंवा ‘ॲग्रोवन’ सुरू करा आणि व्हा सज्ज, निखळ आनंदाची रेसिपी जाणून घ्यायला!

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

बंपर बक्षीस

एलईडी स्मार्ट टीव्ही (११)

पहिले बक्षीस

रेफ्रिजरेटर (२५)

दुसरे बक्षीस

मायक्रोवेव्ह ओव्हन (१००)

तिसरे बक्षीस

फूड प्रोसेसर/ मिक्सर (२००)

सहभागासाठी हमखास बक्षीस स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल

(सहाशे रुपये किंमतीची)

loading image
go to top