

Financial Planning Guidance India
Sakal
चंद्रलेखा एम. आर. डिजिटल फायनान्स एज्युकेटर
आर्थिक नियोजनाबाबत आजही आपल्या देशात अनेक लोक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. महिलावर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत मागे असलेला दिसून येतो, तर तरुणाई झटपट पैसा मिळविण्यासाठी शेअर बाजारात अभ्यास न करता गुंतवणूक करण्याची जोखीम पत्करताना दिसते. अशा वेळी तुमच्या पैशांचे तुम्ही ‘सीईओ’ बनू शकता, हा धडा शिकविण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.