

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ः इनडोअर हॉलमध्ये झालेल्या पुणे शहर विभागाच्या महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळविणाऱ्या चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या खेळाडू आनंद व्यक्त करताना.
चंद्रशेखर आगाशे कॉलेजला जेतेपदाचा मान
महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा
पुणे, ता. १७ ः ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (एआयएसएसएमएस सीआई) आयोजित पुणे शहर विभागाच्या महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनने पटकावले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये झालेल्या महिला गट अंतिम सामन्यात अमृता जाधव व अमृता अगरवालने केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर चंद्रशेखर आगाशे कॉलेजने सरहद महाविद्यालयाचा ३४-३० असा चार गुणांनी पराभव केला. या लढतीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात सरहद महाविद्यालयाने १६-१४ अशी दोन गुणांची आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्रात चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपांत्य फेरीत सरहद कॉलेजने अप्पासाहेब जेधे महाविद्यालयावर ३४-८ असा २६ गुणांनी विजय मिळविला. मध्यंतरांस सरहद कॉलेजने २०-१४ अशी सहा गुणांची आघाडी मिळवली होती.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनने स. प. महाविद्यालयाचा ४९-२७ असा २२ गुणांनी पराभव केला. चंद्रशेखर आगाशे कॉलेजने पहिल्या सत्रात २७-२२ असा पाच गुणांची आघाडी मिळवली होती. या स्पर्धेत महिला गटात सोळा संघांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक प्रभारी क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, पुणे शहर क्रीडा समितीचे सचिव डॉ. तुषार गुजर, सहसचिव डॉ. अभिजित परसे, डॉ. अनिरुद्ध शर्मा, डॉ. अंजुश्री ऑगस्टीन, आयोजक सचिव डॉ मनीषा कोंढरे हे उपस्थित होते.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.