Chandukaka Saraf 200th Anniversary: दोनशे वर्षांच्या विश्वासाचा जल्लोष; प्रामाणिक सेवेसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात कार व दुचाकीच्या चाव्या

दोनशे वर्षांच्या विश्वासाच्या सुवर्णप्रवासात निष्ठावान कर्मचाऱ्यांचा गौरव; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना कार‑दुचाकी, तर इतरांना चांदीच्या भेटवस्तूंनी सन्मान
Chandukaka Saraf Jewels Rewards Loyal Employees with Cars and Bikes

Chandukaka Saraf Jewels Rewards Loyal Employees with Cars and Bikes

Sakal

Updated on

पुणे: दोनशे वर्षांपूर्वी प्रज्वलित केलेली विश्वासाची एक छोटीशी ज्योत आज ‘चंदुकाका सराफ ज्वेल्स’ या भव्य वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. या वटवृक्षाच्या सावलीत असंख्य कुटुंबांच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत, हजारो नात्यांची ऊब अनुभवली आहे आणि प्रत्येक दागिन्यामागे विश्वासाची एक अनमोल कहाणी विणली गेली आहे. सन १८२७ मध्ये सुरू झालेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने दोन शतकांचा हा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. या प्रदीर्घ वाटचालीत काळ बदलला, पिढ्या बदलल्या, फॅशन बदलली आणि दागिन्यांची रूपेही बदलली; मात्र या सर्व बदलांच्या पलीकडे ग्राहकांचा विश्वास आणि शुद्धतेची परंपरा मात्र अढळ राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com