
चंगळ्या बोले कुहू फेम शुभम माळवे या रील स्टारला याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. बदनामी आणि फसवणूक केल्याचा आरोप शुभम माळवे विरोधात करण्यात आला आहे. शुभम आणि त्याच्या आईनं प्रतीक्षा शिंदे या महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात अवमानजनक आणि खोटा व्हिडीओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर खोटा आणि अवमानजनक व्हिडीओ पोस्ट करून प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप प्रतीक्षा शिंदे यांच्या वकिलांनी केला आहे.