जगभर हाहाकारमध्ये माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात येत आहे. त्याची पाहणी करुन आढवा घेण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. या आधीच्या वेळापत्रकानुसार दुपारी १ ते २ या वेळात सीरम इन्स्टिट्युटमध्ये येणार होते, मात्र काही कारणास्तव दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.
पुणे : पुण्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या लशीची माहिती जाणून घेण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेद्र मोदीं तब्बल सव्वाचार पुण्यात असणार आहेत. या आधीच्या दौरयाच्या वेळपत्रकानुसार ते तासभर पुण्यात थांबणार होते. या सगळ्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
जगभर हाहाकारमध्ये माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात येत आहे. त्याची पाहणी करुन आढवा घेण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहेत. या आधीच्या वेळापत्रकानुसार दुपारी १ ते २ या वेळात सीरम इन्स्टिट्युटमध्ये येणार होते, मात्र काही कारणास्तव दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नव्या वेळापत्रकानुसार मोदी दुपारी ३.५० पुणे विमानतळावर येणार आहेत . त्यानंतर ३. ५५ मि. हेलिकॉप्टरने मांजरीकडे रवाना होतील. हेलीपॅडमधून ४.१५ वाजता सीरममध्ये जातील. त्याठिकाणी लसीवर काम करत असलेल्या लॅबमध्ये जाऊन प्रत्येक घटकाशी संवाद साधणार आहे. त्यानंतर सीरमच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी सव्वा तास चर्चा करुन पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी पुणे विमानतळाकडे रवान होतील
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल
दरम्यान, मोदींच्या भेटीत राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामध्ये राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश नसल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.