Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

महाविकास आघाडी तर्फे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू
 Pune Lok Sabha Chief Election Officer Muralidhar Mohol politics
Pune Lok Sabha Chief Election Officer Muralidhar Mohol politicssakal

पुणे : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी आज जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडी तर्फे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई, पुणे येथे बैठका झालेल्या आहेत. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची एकत्रित बैठक होऊन जागावाटप यावर चर्चा होणार आहे.

 Pune Lok Sabha Chief Election Officer Muralidhar Mohol politics
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील विजयाचे सूत्र; ‘फायद्या’च्याच आमदारांना मंत्रिपद

२०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपची शिंदे गटासोबत युती असणार आहे. त्यांचे अद्याप चर्चा सुरू झाली नसती तरी भाजपने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी आज जाहीर करून निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली आहे.

 Pune Lok Sabha Chief Election Officer Muralidhar Mohol politics
Pune Lok Sabha by-election : पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू; पुण्याच्या दोन्ही जागेवर काँग्रेसचा दावा

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिकामी आहे. तेथे पोटनिवडणूक होणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही. पण ही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बापट यांच्या कुटुंबातील स्वरदा बापट यांचे नाव चर्चेत आहे. तसेच मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, धीरज घाटे, मेधा कुलकर्णी हे देखील इच्छुक आहेत.

गेल्याच आठवड्यात प्रदेश उपाध्याय अमर साबळे यांची पुणे लोसकभेचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे .त्यानंतर आता पार्श्वभूमीवर आज मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.शहरातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख निश्चित करताना तेथील माजी आमदार किंवा निवडणूक लढवलेले उमेदवार, विधानसभा अध्यक्षांकडे जबाबदारी दिलेली आहे.

 Pune Lok Sabha Chief Election Officer Muralidhar Mohol politics
Pune Crime : ओतूर पोलीसांनी हरवलेले अंदाजे चार लाख रूपयाचे १९ मोबाईल सायबर सेलच्या मदतीने शोधले

वडगाव शेरी मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवाजीनगर दत्ता खाडे, कसबा मतदारसंघ हेमंत रासने, कोथरूड पुनीत जोशी, हडपसर माजी आमदार योगेश टिळेकर, हडपसर सचिन मोरे, पर्वती जितेंद्र पोळेकर, पुणे कॅन्टोन्मेंट अजिंक्य वाळेकर यांची नियुक्ती केली आहे.

- सचिन मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com