esakal | गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल 
sakal

बोलून बातमी शोधा

Changes in traffic for Ganesh Festival

 गणेशोत्सवासाठी मूर्तीखरेदी व प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी (ता.2) शिवाजी रस्त्यासह मध्यवस्तीतील काही भागांमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवासाठी मूर्तीखरेदी व प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी (ता.2) शिवाजी रस्त्यासह मध्यवस्तीतील काही भागांमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

गणेशमूर्ती विक्रीचे बहुतांश स्टॉल्स हे डेंगळे पूल ते शिवाजी पुलादरम्यान, पालिकेजवळील श्रमिक भवनासमोरील अण्णा भाऊ साठे चौक, शनिवारवाड्याजवळील कसबा पेठ पोलिस चौकी ते जिजामाता चौक, मंडईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांबरोबरच भाविकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. 

बंद रस्ते व पर्यायी मार्ग 
शिवाजी रस्ता-गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभैया चौक बंद असेल. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस व अन्य मोठ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जावे. झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या चालकांनी खुडे चौकातून पालिकेसमोरील प्रीमियम गॅरेज चौक शिवाजी पूलमार्गे गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा. 

पार्किंग व्यवस्था 
- कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान न्यायालयाच्या एका बाजूला 
- वीर संताजी घोरपडे पथावर महापालिका वीजबिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा 
- टिळक पूल ते भिडे पूलदरम्यानचा नदीपात्रातील रस्ता 
- मंडईतील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळ 
- शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक 
- रस्त्याच्या डाव्या बाजूस 

सोमवारी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता लक्षात घेऊनच शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते गोटीरामभैया चौकादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल; तर पीएमपीएल बस स. गो. बर्वे चौकातून डावीकडे न वळता जंगली महाराज रस्त्याने पुढे जाईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
- प्रमोद पत्की, पोलिस निरीक्षक, फरासखाना वाहतूक विभाग 

loading image
go to top