पुणेकरांनो, कर्वे रस्त्याने प्रवास करतायं? मग, वाचा महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्यामुळे कर्वे रस्त्यावरील दुचाकी वाहनांसाठीच्या पुलाजवळील (यशवंतराव चव्हाण चौक) वाहतूकव्यवस्थेत बुधवारपासून (ता. ८) २० जानेवारीपर्यंत बदल होणार असल्याचे महामेट्रोने कळविले आहे.

पुणे - मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्यामुळे कर्वे रस्त्यावरील दुचाकी वाहनांसाठीच्या पुलाजवळील (यशवंतराव चव्हाण चौक) वाहतूकव्यवस्थेत बुधवारपासून (ता. ८) २० जानेवारीपर्यंत बदल होणार असल्याचे महामेट्रोने कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुचाकीच्या पुलाजवळील चौकात मेट्रो मार्गासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर सेगमेंट जोडण्याचे काम बुधवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पूना हॉस्पिटलकडून दुचाकी वाहनांच्यासाठीच्या पुलावरून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांना आयुर्वेद रसशाळा चौकातून ‘यू टर्न’ करून डेक्कनकडे जाता येईल; तसेच नळस्टॉपकडून पूना हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनांना शेलारमामा चौकातून ‘यू टर्न’ करून पूना हॉस्पिटलकडे जाता येईल, असे महामेट्रोतील अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अजय कुमार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in traffic on the Karve road will start today for metro work