esakal | पुण्यात म्युकरमायकॉसिसबद्दल अनागोंदी; नातेवाईकांचे अजूनही हाल
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात म्युकरमायकॉसिसबद्दल अनागोंदी; नातेवाईकांचे अजूनही हाल

पुण्यात म्युकरमायकॉसिसबद्दल अनागोंदी; नातेवाईकांचे अजूनही हाल

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : जीवघेण्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या शहर आणि जिल्ह्यात चारशेच्यावर गेली असतानाही. या आजाराच्या निदान आणि उपचाराची व्यवस्था अजूनही नियोजनाच्या पुढे सरकलेली नाही. एकीकडे उपचार प्रचंड महाग असतानाही सरकारी रूग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रूग्ण खासगी रूग्णालयात दाखल आहे. दुसरीकडे ज्या खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तिथेही औषधांचा पुरवठा सुरळीत होत नाही. पर्यायाने रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. (Chaos about mucormycosis in Pune Relatives still facing issues)

सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील ससून आणि औंध येथील जिल्हा रूग्णालयात यासंबंधीचे उपचार उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिसचे उपचार प्रचंड गुंतागुंतीचे, वेळखाऊ आणि महागडे आहे. बुरशीने शरिरात प्रवेश केला तर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. अशा वेळी निदान, शस्त्रक्रिया आणि आवश्यक औषधे देण्यास उशीर झाल्यास त्याचा गंभीर परिणाम रुग्णावर होतो. काही प्रसंगी हे जिवावरही बेतू शकते. असे असतानाही प्रशासनाकडून कासवाच्या गतीने पाऊले उचलण्यात येत असून, जे काही उपाययोजना होत आहेत. त्यातही अनागोंदी माजलेली दिसते. महापालिकेच्या वतीने दळवी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्या विषयीची प्रगती बुरशीच्या वाढीच्या वेगापेक्षा खुपच कमी आहे.

हेही वाचा: 'चला, वाजवा थाळ्या', ब्लॅक फंगससाठीही मोदी लवकरच करतील घोषणा

म्युकरमायकोसिसचे वास्तव :

- उपचाराचा खर्च खुपच जास्त असल्याने काही रूग्ण उपचार न घेताच परततात

- उपचारासाठी केवळ इंजेक्शन नव्हे तर निष्णात सर्जनची आवश्यकता

- दीर्घकाळ चालणाऱ्या या उपचारांत एका रुग्णाला १५०च्या वर इंजेक्शनची गरज भासते

- जिथे गरज आहे तिथे इंजेक्शनचा पुरवठा कमी

- सरकारच्या योजनांमध्ये काही खासगी हॉस्पिटलचा समावेश नाही

- योजनांची घोषणा झाली आहे पण प्रत्यक्षात किती जणांना लाभ मिळाला, हे अजूनही अनुत्तरीत

हेही वाचा: सोशल मीडियावर 'तो' शब्द असणारा मजकूर हटवा; मोदी सरकारचं पत्र

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या (२० मे पर्यंत) :

महापालिकेच्या रूग्णालयात : ७

खासगी रूग्णालयात : १४३

ससून रूग्णालय : ७८

दळवी रूग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरु करण्याचे काम आठवडाभरात होईल. त्यासाठीचे वैद्यकीय साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. त्याआधी म्युकरमायकोसिसचे रूग्ण आणि संशयितांची यादी तयार करून त्यांच्यावर प्राधान्य क्रमानुसार उपचार केले जाणार आहे.

- डॉ. किरण भिसे, दळवी रूग्णालय (म्युकरमायकोसिस विभाग)

म्युकरमायकोसिसचे ७८ रूग्ण गेल्या आठवड्या भरात ससूनमध्ये दाखल आहे. त्यांच्यासाठी दोन दिवसपुरले एवढा इंजेक्शनचा साठा आहे. ससून रूग्णालयात बुरशीच्या उपचारासाठी निष्णात असलेले डॉक्टर आहेत. त्याचबरोबर आम्ही इतरही डॉक्टरांना या उपचारासंबंधी प्रशिक्षण देत आहे. यासंबंधीची आदर्श कार्यप्रणालीही आम्ही विकसित केली आहे.

- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रूग्णालय

loading image
go to top