दाभोलकर हत्या प्रकरण: अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे विरोधात दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भावे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल न केल्यास भावेला जामीन मिळण्याची शक्‍यता होती. त्यामुळे सीबीआयने एक दिवस आधीच दोषारोपपत्र दाखल केले आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे विरोधात आज येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भावे विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल न केल्यास भावेला जामीन मिळण्याची शक्‍यता होती. त्यामुळे सीबीआयने एक दिवस आधीच दोषारोपपत्र दाखल केले आहे. भावे याचा जामीन अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला आहे. तर वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वी जमीन देण्यात आला आहे.

अॅड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा सीबीआयने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charge Sheet Filed Against Adv Sanjeev Punalekar and Vikram Bhave in Dabholkar murder case