अखेर 'त्या' युवतीचा खुन झाल्याची शक्यता निष्पन्न : पोलिसांच दाखल केली फिर्याद

Charges filed against 4 accused for death of girl due to forcibly tying in a tempo
Charges filed against 4 accused for death of girl due to forcibly tying in a tempo
Updated on

उरुळी-कांचन (पुणे) : मनोरुग्ण समजून एका युवतीला बळजबरीने टेंपोमध्ये बांधून तिच्या मृत्यूला जबाबदार झाल्याच्या कारणावरुन चार आरोपींवर नुकताच गुन्हा दाखल केला. या घटनेत स्वत: लोणी-काळभोर पोलिस फिर्यादी झाले असून या गुन्ह्याचा खोलवर तपास करण्याचा इरादा पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी एका युवतीचा संशयास्पद मृत्यू होऊनही तिच्या मृतदेहाची विल्हेवाट परस्पर लावल्याबद्दलचा संशय सकाळने व्यक्त केला होता. त्यालाच अनुसरुन वरील घटनेने सकाळच्या वृत्ताला दुजोरा मिळाला म्हणण्यास हरकत नाही. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कालीदास म्हस्के, संदेश चोरघे (वय २६, रा.सोरतापवाडी), शेखर प्रकाश म्हस्के (वय ३३,रा.डाळींब, ता.दौंड), अदित्य देवेंद्र खेडकर (वय २१, खेडेकरमळा, उरुळी-कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोणीकाळभोर पोलिसांच्यावतीने फिर्यादी रोहीदास दौलत पारखे (पोलिस शिपाई, लोणीकाळभोर) यांनी दिलेल्या माहित नुसार ''१७ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास वरील मयत युवती पिंकी उर्फ स्वप्नाली देवेंद्र खेडेकर (वय ३१, रा.खेडेकर मळा, उरुळीकांचन, ता.हवेली) हिने तिचा मावसभाऊ कालीदास म्हस्के याची गरोदर पत्नी आरती म्हस्के व कालीदास या दोघांनाही नखांनी ओरबडले व ढकलून दिले होते. हे तिचे कृत्य मनोरुग्ण असल्याचे समजून तिचे हात रस्सीने कंबरेपासुन पाठीमागील बाजुस बांधून टेम्पो (एम एच 12 पी क्यु 2427) मध्ये पाठीमागे जबरदस्तीने बसवले. त्यानंतर डाळींब ते उरूळी कांचन या कच्च्या रस्त्याने व तेथुन सोलापुर-पुणे हायवे रोडने कुंजीरवाडी येथे नेले. याच दरम्यान पिंकीचा मृत्यू झाला. वरील आरोपींनी याबाबत पोलिसांना कुठलीच माहिती न देता मयत पिंकीचा तिच्या घराजवळील स्मशानभूमी सोडून उरुळी-कांचन येथील स्मशानभूमीत तिचा परस्पर अंत्यसंस्कार करुन पुरावा नष्ट केला. 

पुण्यातील जम्बोची कमाल! ३१ दिवस ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील महिला अखेर कोरोनामुक्त !

दरम्यान, वरील सर्व घटनेची कुजबुज उरुळी-कांचन परिसरात होत असल्याचे वृत्त सकाळने यापूर्वीच प्रसिध्द केले होते व संशय उपस्थित केला होता. त्यालाच पुष्टी देणारी वरील घटना सत्य निष्पन्न झाली असून लोणी काळभोर पोलिसांनी स्वत: फिर्याद दाखल करुन वरील गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com