Nasrapur Crime : चिमुरडीवरील अत्याचार, खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित; खटल्याची रोज होणार सुनावणी

नसरापूर परिसरात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या संवेदनशील खटल्याची सुनावणी गुरुवार (ता. २८) पासून विशेष न्यायालयात झाली सुरू.
Justice in Nasrapur Case

Justice in Nasrapur Case

esakal

Updated on

पुणे - नसरापूर परिसरात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या संवेदनशील खटल्याची सुनावणी गुरुवार (ता. २८) पासून येथील विशेष न्यायालयात सुरू झाली. न्यायालयाने सरकार पक्षाकडे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे स्पष्ट करत दोषारोप निश्चित केले.

आरोपी भीमराव कांबळे याला सकाळी ११ वाजता कडक पोलिस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या खटल्याची सुनावणी उद्यापासून दररोज ‘इन-कॅमेरा’ घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com