चऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक वारीच्या पार्श्‍वभूमीवर रुंदीकरण केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण वेगात सुरू आहे. 

आळंदीतील काळे कॉलनी ते बोपखेल फाटा या सुमारे १० किलोमीटर रस्त्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने रुंदीकरण केले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी एकपदरी असलेला पालखीमार्ग दहा पदरी प्रशस्त झाला आहे. या मार्गाचे तीन टप्प्यांत रुंदीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी भूसंपादन रखडले होते.

त्यातील एक म्हणजे चऱ्होली फाटा येथील सुमारे पाचशे मीटरचे अंतर. आता तोही प्रश्‍न सुटला आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून बुधवारी डांबरीकरण सुरू होते. येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिक वारीसाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दीड मीटर रुंदीचा पदपथ आणि शेजारी सायकल ट्रॅक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Web Title: Charholi phata palakhi route development