महत्त्वाचं काम असेल तरच ऑफिसमध्ये या; सहधर्मादाय आयुक्‍तांचे आवाहन

Govt_Offices
Govt_Offices

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धर्मादाय सह आयुक्‍त कार्यालयात गर्दी करू नये. पक्षकार आणि नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल, तरच कार्यालयात यावे. शक्‍य असल्यास ऑनलाइन आणि दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्‍त दिलीप देशमुख यांनी केले आहे. येथील धर्मादाय सह आयुक्‍त कार्यालयात पुण्यासह नगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील नागरिक कामानिमित्त येत असतात. सध्या कार्यालयात नियमानुसार 30 टक्‍के कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनमुळे कार्यालयात गर्दी कमी होती. परंतु जिल्हाबंदी उठल्यानंतर प्रलंबित कामांसाठी नागरिक कार्यालयात गर्दी करीत आहेत. काही संस्थांचे चार-पाच पदाधिकारी हे कामानिमित्त एकत्रितपणे येतात. त्याऐवजी तातडीचे काम असेल, तर एकाच पदाधिकाऱ्याने कार्यालयात आल्यास गर्दी कमी होऊन संसर्गाचा धोका टळेल. सुनावणीसाठीही वकील आणि पक्षकारांना पूर्वनियोजित वेळ देण्यात येत आहे. तसेच, महत्त्वपूर्ण विषयांवरील सुनावणी घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. 

येथील धर्मादाय सह आयुक्‍त कार्यालयात यापूर्वीच तीन कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामासाठी आठ खिडक्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करावा. तसेच, नियमांचे पालन करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 

गर्दी टाळून कामाचा समन्वय राखावा 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. वादग्रस्त नसलेल्या प्रकरणांमध्ये लवकर आदेश व्हावेत. जेणेकरून वकिलांनाही ते उपयुक्‍त होईल. तातडीच्या प्रकरणांमध्ये पूर्वनियोजित वेळेनुसार एक पक्षकार आणि त्यांचे वकिल यांनीच कार्यालयात यावे. अनावश्‍यक गर्दी टाळून कामाचाही समन्वय राखला जाईल, असे मत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनचे विश्‍वस्त ऍड. शिवराज कदम जहागिरदार यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com