इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी

NCP_Leaders_Meeting
NCP_Leaders_Meeting

पुणे : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केल्याने सुरू झालेल्या भारत-चीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैन्य दलातील माजी अधिकारी आणि या विषयाच्या तज्ज्ञांशी गुरुवारी (ता.३) चर्चा केली.

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले या बैठकीस उपस्थित होते. गोखले यांनी यावेळी इंडो-चायना संबंध आणि सीमावाद याबाबतचा इतिहास मांडला. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत काय करता येईल आणि गेल्या काही महिन्यांत झालेल्या चकमकींविषयी त्यांचे म्हणणे मांडले. नव्वदच्या दशकात पवार यांनी चीनला भेट दिली होती. त्यावेळचे अनुभव त्यांनी बैठकीत सांगितले. आपला आर्थिक विकास थांबविण्यासाठी चीनची धोरणात्मक रणनीती आणि राजकीय विचार याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. चीनने भारतीय उपखंडाला घातलेला वेढा आणि दक्षिण चीन समुद्रात त्यांची वाढती उपस्थितीवर देखील पवार यांनी भाष्य केले. श्रीलंका, नेपाळ आणि चीनच्या हस्तक्षेपावर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील याविषावर चर्चा केली. येत्या काही दिवसांत संसदेचे अधिवनेश सुरू होणार आहे. त्यात भारत-चीन संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. त्यावरील तयारीचा भाग म्हणून हा वाद नेमका काय आहे? तो आणखी चिघळू शकतो का? या अनुषंगाने पवार यांनी या तज्ज्ञांशी चर्चा केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com