चासकमान धरण ‘ओव्हर फ्लो’; १२९५ क्युसेकने विसर्ग सुरू

खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या जनतेचे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागले होते.
Chaskaman Dam
Chaskaman DamSakal

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर खोऱ्यासह चासकमान धरणाच्या (Chaskaman Dam) पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे (Rain) धरणाच्या पाणीसाठ्यात (Water Storage) वेगाने वाढ होऊन धरण बुधवारी (ता. ४) पहाटे शंभर टक्के (८.५३ टीएमसी) भरले. त्यामुळे सकाळी धरणाची पाचही वक्र दारे उघडून भीमा नदीच्या पात्रात १२९५ क्युसेकने विसर्ग सुरू झाला, अशी माहिती सहायक अभियंता प्रेमचंद शिंदे यांनी दिली. मागील वर्षी धरण भरण्यास ३० ऑगस्ट हा दिवस उजाडला होता.

खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या जनतेचे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागले होते. जून व जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जेमतेम पावसामुळे चालू वर्षी धरण भरणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. वर्षभर पाण्याचे नियोजन कसे होणार, याबरोबरच दुष्काळाच्या चर्चाही मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या होत्या. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर वरुणराजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरण भरण्याची आशा उत्पन्न झाली. भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या संततधार पावसाने भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून, ओढ्या-नाल्यांनाही पूर आले आहेत.

Chaskaman Dam
पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’

तसेच, चासकमान धरणाच्या वरील कळमोडी धरण २२ जुलै रोजीच शंभर टक्के भरले. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या विसर्गातून येणारे पाणी चासकमान धरणात येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यात मोठी वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे चासकमान धरणात सद्यःस्थितीत एकूण पाणीसाठा ८.५३ टीएमसी झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ७.५७ टीएमसी झाला आहे. धरणाची टक्केवारी १०० टक्के झाली आहे. धरणात येणारी पाण्याची आवक ३००० क्यूसेक असून, धरण परिसरात एक जूनपासून ४४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीनंतर कालव्याद्वारे ५५० क्यूसेक व भीमा नदीच्या पात्रात अतिवाहकाद्वारे ३०० क्यूसेक; तर धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीच्या पात्रात १२९५ क्यूसेक, असा एकूण २१४५ क्यूसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

असा वाढला साठा

तारीख टक्केवारी

२३ जुलै ५२. ०३

२४ जुलै ६४.६५

२६ जुलै ७५.३६

२९ जुलै ८५.६४

१ ऑगस्ट ९२.२२

२ ऑगस्ट ९४.३७

४ ऑगस्ट १००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com