esakal | Indapur : छत्रपतीच्या सभासदांची दिवाळी होणार गोड
sakal

बोलून बातमी शोधा

chatrpati cooperatibe

Indapur : छत्रपतीच्या सभासदांची दिवाळी होणार गोड

sakal_logo
By
राजकुमार थाेरात

वालचंदनगर: दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम व्याजासहित जमा करणार असल्याची माहिती श्री छत्रपती सहाकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली. भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व उस गळीत हंगामाचा मोळी पुजनाचा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक अॅड. रणजित निंबाळकर,बाळासाहेब पाटील,सर्जेराव रणवरे,अभिजित रणवरे,बाळासाहेब पाटील, डाॅ.दिपक निंबाळकर, रसिक सरक, दत्तात्रेय सपकळ राजेंद्र गावडे ,संतोष ढवाण सुमन दराडे, तेजश्री देवकाते, कार्यकारी संचालक अशोक जाधव,हनुमंत करवर,अशोक मोरे उपस्थित होते. कारखान्याचे गतवर्षीच्या हंगामातील एफआरपीची रक्कम २३९३.२० रुपये असून यातील २२०० रुपये कारखान्याने दिले असून उर्वरित १९३.२० रुपये व एफआरपीचे व्याज दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर जमा होणार आहे.

यावेळी काटे यांनी सांगितले की, छत्रपती कारखान्याला कर्जाच्या चक्रामधून बाहेर काढण्यासाठी सर्व सभासदांची मोलाची साथ हवी आहे. चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळप करण्याचे कारखान्याचे उदिष्ठ आहे. जेवढे गाळप जास्त होते तेवढा कारखान्याचा व सभासदांचा फायदा होणार असून सभासदांनी सर्व उस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला द्यावा. रिकव्हरी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रिकव्हरी असलेल्या उसाच्या जातीची लागवड करावी.संचालक मंडळाने चालू वर्षी उस लागवड धोरणामध्ये बदल केला असून याचा फायदा रिकव्हरी वाढण्यासाठी तसेच एफआरपी वाढण्यासाठी होईल. केंद्र व राज्य सरकारने साखर कारखान्यातील कामगारांनी १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. याचे परिपत्रक ज्या दिवशी निघेल त्याच दिवशीच छत्रपतीमधील कामगारांना पगारवाढ करणार असल्याचे सांगितले. यावेळी जाचक यांनी सांगितले की, चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उस मुबलक असून गाळपाचे कारखान्यापुढे आवाहन आहे. पूर्ण क्षमतेने कारखाना चालणे गरजेचे आहे.

हेही वाचा: आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ

उसाची रिकव्हरी ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तयार होत असून कारखाना रिकव्हरी काढण्याचा प्रयत्न करीत असतो. राज्यामध्ये छत्रपती कारखान्याने साखर धंद्याला दिशा देण्याचे काम केले असून छत्रपतीच्या दरावरती राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा दर ठरत होता.कारखान्याने एफआरपी ची रक्कम एकाच टप्यामध्ये द्यावी. उस उत्पादक सभासद व कामगारांच्या प्रश्‍नासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणार असल्याचे जाचक यांनी सांगितले. यावेळी माजी संचालक भाउसाहेब सपकळ,अॅड.संभाजी काटे, राजाराम रायते, युवराज रणवरे यांनी मते व्यक्त केली.

loading image
go to top