Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कलाकाराला वाट मोकळी करून दिली आहे. यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाआरतीची निर्मिती करण्यास पुढाकार घेतला आहे. सहा मिनिटांची ही महाआरती आहे.

मंचर - महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कलाकाराला वाट मोकळी करून दिली आहे. यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाआरतीची निर्मिती करण्यास पुढाकार घेतला आहे. सहा मिनिटांची ही महाआरती आहे.

विशेष म्हणजे पोलिस दलातीलच गीतकार, गायक व कलाकारांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाआरतीची उद्‌घोषणा सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण फणसे मुंबई यांनी केली आहे. संगीत दिग्दर्शक अद्वैत पटवर्धन यांचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हिडिओ दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले आहे. पुणे येथील शिवगर्जना प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाने अदाकारी पेश केली आहे. अनेक चित्रपटनिर्मात्यांकडून आरतीला मागणी वाढू लागली आहे. पुण्यातील क्षितिज प्रॉडक्‍शनने चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात त्याचे चित्रीकरण केले आहे. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वासराजे थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांच्यासह चार सहकाऱ्यांनी अभिनय केला आहे. आरतीची नोंदणी मराठी चित्रपट महामंडळाकडे करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने चित्रीकरणाची सुरुवात सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद डावरे यांच्या हस्ते झाली.

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

महाआरतीसाठी कर्ज काढले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत आरतीचे काम पूर्ण केले आहे. 
- कल्पना थोरात, निर्मात्या  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chatrapati shivaji maharaj Mahaarati creation by police actor