बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्यावतीने शुक्रवारी (ता. 7) सकाळी 10 वाजता कर्वे रस्ता येथील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डींग, महर्षी कर्वे विद्या विहार येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पुणे शहर, भोसरी आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील एकूण 32 उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. 

पुणे : पुणे शहर, भोसरी आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध खासगी उद्योग-व्यवसायांमधील तीन हजार 132 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी किमान 10 वी 12 वी अथवा कोणत्याही शाखेचा पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा होल्डर तसेच इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फिजियोथेरेपिस्ट, ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील पात्रताधारक युवक-युवतींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्यात वृद्ध महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत रिक्षाचालकाने लुटले 25 हजार रुपये

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्यावतीने शुक्रवारी (ता. 7) सकाळी 10 वाजता कर्वे रस्ता येथील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डींग, महर्षी कर्वे विद्या विहार येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पुणे शहर, भोसरी आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील एकूण 32 उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. 

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन

रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपले पसंतीक्रम नोंदवावेत. खासगी क्षेत्रातील या रिक्तपदांच्या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवावा. मेळाव्यास उपस्थित राहताना सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज छायाचित्रे, अर्जाच्या आणि आधारकार्डच्या प्रती सोबत आणाव्यात. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रांच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार आणि एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी यांनी केले आहे.

पुणे : वडगाव शेरीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand 132 vacant posts will be filled in Pune Bhosari and Pimpri Chinchwad area