'आरटीओ'ची फसवणूक करणाऱ्या बस मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गजानन गुरव (वय 42, रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुरव हे डिसेंबर 2019 मध्ये वायुवेग पथक क्रमांक तीनमध्ये कार्यरत होते.

पुणे : बनावट प्रवासी वाहतूक परवाना काढून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बस मालक महिला व चालकाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गजानन गुरव (वय 42, रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गुरव हे डिसेंबर 2019 मध्ये वायुवेग पथक क्रमांक तीनमध्ये कार्यरत होते. यावेळी त्यांनी शास्त्रीनगर चौकात एक खासगी प्रवासी बस थांबवली. बसची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये 25 प्रवासी होते. संबंधीत प्रवाशांना पुणे, शनि शिंगणापूर, शिर्डी,वणी, सटाणा, ठाणे, मुंबई मार्गे पुन्हा पुणे असा प्रवास घडविण्यात येणार होता. बसच्या क्रमांकावरून माहिती घेतल्यानंतर बसचा कर थकीत असून योग्यता प्रमाणपत्राची मुदत देखील संपल्याचे निदर्शनास आले.

वाहन चालकाने तात्पुरता परवाना क्रमांक फिर्यादीकडे हजर केला होता. हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयात पडताळणीसाठी जमा करुन बस वाघोली येथील वाहन पार्किंगमध्ये जमा करण्यात आली होती. दरम्यान परवान्याची तपासणी केल्यानंतर हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला नसून तो बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसमालक महिलेसह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating case filed against bus driver in Pune