esakal | मिठाई खाण्यापूर्वी वापरण्यायोग्य तारीख बघा
sakal

बोलून बातमी शोधा

sweet

मिठाई खाण्यापूर्वी वापरण्यायोग्य तारीख बघा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: मिठाई, दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ फक्त नोंदणीधारक किंवा परवाना घेतलेल्या दुकानांमधुनच खरेदी करावे, असे आवाहन ‘अन्न व औषध प्रशासना’च्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर मिठाईची मागणी वाढते.

हेही वाचा: Pune : किरीट सोमय्यांनी घेतली जिल्हा बॅंकेकडून माहिती

अशा वेळी प्रत्येक नागरिकास सुरक्षित व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावे, यासाठी ‘एफडीए’ने खाद्य नमुन्यांच्या तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (यूज बाय डेट) दिनांक टाकावा. परवाना किंवा नोंदणीधारकाकडून कच्चे अन्नपदार्थ व खवा खरेदी करावे

पदार्थ तयार करताना पिण्यायोग्य पाणी वापरावे. कामगारांना त्वचा व संसर्गजन्य रोग नाहीत, यासाठी वैद्यकीय तपासणी करावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे ग्राहकांनी हे करावे मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करताना ‘यूज बाय डेट’ अवश्य बघावी. उघड्यावरील अन्न पदार्थ खरेदी करू नये. माव्यापासून बनविलेल्या पदार्थाचे सेवन शक्यतो २४ तासांमध्ये करावे. बंगाली मिठाई आठ ते दहा तासांमध्ये खावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये.

प्रत्येक नागरिकास सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी, तसेच त्यातील भेसळ रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी अन्न पदार्थ तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करावेत. - शिवाजी देसाई, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

loading image
go to top