esakal | Pune : किरीट सोमय्यांनी घेतली जिल्हा बॅंकेकडून माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

Pune : किरीट सोमय्यांनी घेतली जिल्हा बॅंकेकडून माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी गुरुवारी (ता.९) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जरंडेश्‍वर साखर कारखाना कर्ज वितरण प्रकरणाची माहिती घेतली. या माहितीसाठी सोमय्या हे सुमारे पाऊण तास जिल्हा बॅंकेत थांबले होते. यावेळी त्यांनी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्ज वितरणाची आणि कर्ज वाटप नियमावलीबाबतची माहिती घेतली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोमय्या हे पुणे जिल्हा बॅंकेत पोहोचले. तेथे त्यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांची भेट घेऊन, या कर्ज प्रकरणाची माहिती देण्याची मागणी केल्याचे बॅंकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

जिल्हा बॅंकेच्यावतीने साखर तारणावर कारखान्यांना कर्ज वितरित केले जाते. त्यानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्‍वरला हे कर्ज वाटप केले आहे. परंतु हे वाटप नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

loading image
go to top