बाप रे...पुण्याजवळ टॅंकर उलटून पसरलेत रसायनाच्या फेसाचे ढग... 

शरद पाबळे
मंगळवार, 30 जून 2020

लिक्वीड सोपचे केमिकल घेऊन जाणारा टँकर नियंत्रण सूटून रस्त्यालगतच्या शेतात उलटला. त्यानंतर रस्त्यावर व शेजारील शेतात सांडलेल्या या केमिकलमध्ये पावसाचे पाणी मिसळून

केसनंद (पुणे) : पूर्व हवेलीतील बिवरी येथे टँकर उलटून सांडलेल्या रसायनामध्ये पावसाचे पाणी मिसळले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर फेसाचे ढग तयार झाले. त्यातून शेतमालाचे नुकसान तर झालेच, मात्र स्थानिक नागरिकांतही काही काळ भितीचे वातावरण पसरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे   

पूर्व हवेलीत वाडेबोल्हाई- कोरेगाव मूळ रस्त्यावर बिवरी व अष्टापूर गावाच्या शिवेवर बिवरी हद्दीत लिक्वीड सोपचे केमिकल घेऊन जाणारा टँकर (क्र. एम. एच. ४३ वाय ९४८१) नियंत्रण सूटून काल रात्री रस्त्यालगतच्या शेतात उलटला. त्यानंतर रस्त्यावर व शेजारील शेतात सांडलेल्या या केमिकलमध्ये पावसाचे पाणी मिसळून मोठ्या प्रमाणावर उंचच उंच फेस तयार झाला. तसेच, या फेसाचे छोटे थवे ढगाप्रमाणे हवेत पसरले. त्यामुळे आज दिवसभर स्थानिक नागरिकांत घबराट पसरली. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

याबाबत पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप व जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप यांनी पुढाकार घेत लोणीकंद पोलिस, आरोग्य यंत्रणा, महसुल विभागासह इतर यंत्रणाना व संबंधित कंपनीलाही कळवले. लोणीकंद पोलिसांसह, आरोग्य यंत्रणा, महसूल विभागाने घटनास्थळी येत पाहणी करून पंचनामाही केला. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून शेतात सांडलेल्या केमिकलमध्ये पावसाचे पाणी मिसळल्याने फेस तयार झाला असून, तो ज्वलनशील वा धोकादायक नसल्याचे संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून दुपारी सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

हा अपघात व सांडलेल्या केमिकलमुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical tanker accident near Pune