
पुणे - तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक (Old People) कर्करोगाने (Cancer) आजारी (Sickness) आहेत का? त्यांना किमोथेरपीसारखे वैद्यकीय उपचार (Medical Treatment) सुरू आहेत का? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असल्यास आयुर्वेदातील रसायन उपचारपद्धती त्याला सहायक ठरते, तसेच पर्यायी उपचाराचा मार्ग म्हणूनही तुम्ही याचा विचार करू शकता, असे शास्त्रीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील ‘रसायु कॅन्सर क्लिनिक’ने हे संशोधन केले. रिअल वर्ल्ड एव्हिडन्स (आरडब्लई) ऑन सेफ्टी अँण्ड एफिकसी ऑफ हर्बोमिनरल रसायन थेरपी ऑन ओव्हरऑल सर्व्हायव्हल (ओएस) अँण्ड पेशंट रिपोर्टेड आउटकम (पीआरओ) मेजर्स इन जेरिएट्रिक कॅन्सर पेशंट्स’ या विषयावरील संशोधन प्रबंधाचे सादरीकरण करण्यात आले. ‘रसायु कॅन्सर क्लिनिक’चे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक वैद्य योगेश बेंडाळे यांनी हा प्रबंध सादर केला. वैद्य विनिता बेंडाळे, वैद्य पूनम बिरारी, वैद्य अविनाश कदम, वैद्य आनंद राव पाटील आणि वैद्य वैशाली पाटील यांनी त्याचे सहलेखन केले आहे. कॅनडामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधनिबंध सादर करण्यात आला. कॅनडातील ‘दि मल्टी नॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर’ (एमएएससीसी) आणि ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर ओरल आँकॉलॉजी (आयएसओओ) यांच्यातर्फे आयोजित वार्षिक परिषदेत याचे सादरीकरण करण्यात आले.
का केले संशोधन?
कर्करोगविरोधी आधुनिक उपचार पद्धतींबरोबरच रुग्ण आयुर्वेदातील उपचार घेतात. जे रुग्ण कर्करोगावरील आधुनिक उपचारांसाठी पात्र नाहीत किंवा त्या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत, तसेच जे वृद्ध अशा पर्यायी उपचारांच्या शोधात आहेत.
याबाबत संशोधनपूर्ण सहायक आणि पर्यायी उपचारपद्धतींच्या (कॅम) किंवा इंटिग्रेटिव्ह आँकॉलॉजीच्या (समावेशक कर्करोगोपचार शास्त्र) लाभांचे मूल्यमापन करणारी कोणतीही पद्धतशीर आकडेवारी उपलब्ध नव्हती.
संशोधनाचे उद्दिष्ट काय?
आतडे, अन्ननलिका, स्वादुपिंड, स्तन, मूत्राशय अशा अवयवांचे कर्करोग झालेल्या वृद्ध रुग्णांवर आयुर्वेद रसायन उपचार पद्धतीची सुरक्षितता आणि परिणामकारकता अभ्यासणे
संशोधनाचा निष्कर्ष
कर्करोगविरोधी आधुनिक उपचार पद्धतींसोबत आयुर्वेद रसायन उपचार पद्धती अवलंबता येते
आयुर्वेद रसायन उपचार पद्धती ही रुग्णांना किमोथेरपी सहन करण्यास आणि किमान विपरीत परिणामांसह किमोथेरपी पूर्ण करण्यास चांगल्या प्रकारे मदत करते
आयुर्वेद आणि कर्करोगविषयक आधुनिक उपचारपद्धती यांच्या एकत्रीकरणाची, तसेच इंटिग्रेटिव्ह आँकॉलॉजीमध्ये अधिक संशोधनाची आणि समन्वयाची गरज निर्माण होते
रसायन उपचारपद्धतीमुळे अनुकूल प्रतिसाद दिसून येत असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण या संशोधनात नोंदवण्यात आले
जे रुग्ण आधुनिक कर्करोगविरोधी उपचारांसाठी पात्र नाहीत, किंवा त्या उपचारांना आता प्रतिसाद देत नाहीत, अशा रुग्णांमध्ये जीवनदर्जा आणि त्यांच्या शारीरिक हालचाली कायम राखण्याची क्षमता या उपचारपद्धतीमध्ये असल्याचे संशोधनात दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.