
पुणे : कात्रज- देहू रस्ता बाह्यवळण मार्गावर चांदणी चौकात पुण्याच्या प्रवेशद्वारावर पुणे महापालिकेतर्फे ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ साकारण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६० फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी २९ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, यास आज (ता. ८) पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिटी) मंजुरी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश दिल्यानंतर वर्षभरात हे स्मारक पूर्ण होणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.