छत्रपती राजाराम महाराज प्रगल्भ, धुरंधर राजा : श्रीमंत कोकाटे

राजेंद्रकृष्ण कापसे
Monday, 24 February 2020

शिवपुत्र व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे दूरदृष्टी, मुत्सद्दी, प्रगल्भ, धुरंधर असा राजा होता." असे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

खडकवासला (पुणे) : "शिवपुत्र व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे दूरदृष्टी, मुत्सद्दी, प्रगल्भ, धुरंधर असा राजा होता." असे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती, पुणे व राष्ट्रसेवा समूहच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज जयंती व शिवजन्मोत्सव सोहळा सांगता समारंभ आज सोमवार सिंहगडावर पार पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी कोकाटे बोलत होते. संस्थेच्या वतीने पहिला छत्रपती राजाराम महाराज पुरस्कार सिंहगडाचा पुरात्त्वीय विषयावर पीएचडी करणारे नंदकिशोर मते यांना कोकाटेंच्या हस्ते दिला. गडपूजन, छत्रपती राजाराम महाराज, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक पूजन, शाहीर राजेंद्र कडुस्करांनी पोवाडा सादर केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे, विकास दांगट, अक्रूर कुदळे, अनिता इंगळे, पराग मते, विलास मते, महेश कदम, विजय कोल्हे, गोरख मुजुमले, सरपंच राजाराम वाटाणे, सौरभ मते, संस्थेचे पदाधिकारी अमोल मानकर, नीलेश बोडके, स्मिता पोकळे, मनीषा मोरे, स्वप्निल वाघ यांच्या सर्व गाव शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंहगड चढणे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिले. तर गड संवर्धन नाच्या काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार केला.

कोण आहे इवांका; जिचे ट्रम्प अध्यक्ष बनवण्यामागे होते महत्वपूर्ण योगदान

कोकाटे म्हणाले, "छत्रपती राजाराम स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी व राजमाता ताराबाई या मुघलाच्या बलाढ्य सैन्याशी लढा देऊ शकल्या. पहिला पुरस्कार मते यांना दिला आहे ती योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून सिंहगडाचा पुरातत्त्वीय अभ्यास केला जात आहे. पुरातत्वचा अभ्यास करताना जागरूक राहून अवशेषांवरून निष्कर्ष मांडावे लागतात." मते म्हणाले, गड संवर्धन करताना पुरातत्व अभ्यासाची आवड निर्माण झाली. त्यानंतर डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हा पुरस्कार माझे कुटुंब, मित्र व गड संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या वतीने स्वीकारतो. सिंहगडाच्या सात मेटावरील महादेव कोळी बांधवानी सिंहगड स्वराज्यात राहण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. पुरस्कारात मिळालेली रक्कम त्यांनी परत राष्ट्र सेवा समूहाच्या ग्रंथालयास दिली.

पोकळे यांनी छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची घोषणा केली. सुत्रसंचालन उमेश शिंदे यांनी तर  प्रास्ताविक प्रा.औदुंबर लोंढे यांनी केले. विद्याधर थोपटे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati Rajaram Maharaj is Brilliant King says Shrimant Kokate