संभाजी महाराज

संभाजी महाराज
Published on

PNE26W19153
अहिल्यानगर ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वराज्य रक्षणासाठी संभाजी महाराजांचा लढा प्रेरणादायी
ज्योती गाडे ः छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मनपाकडून अभिवादन
अहिल्यानगर, ता. १४ ः छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी संकटांचा सामना करत स्वराज्य टिकवण्यासाठी दिलेला लढा प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त मेहेर लहारे, नगरसेवक निखिल वारे, अमोल गाडे, बाळासाहेब पवार, बाबुशेठ नागरगोजे, सुरेश बनसोडे, महेश तवले, करण कराळे, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापालिकेतर्फे मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बाल कलाकारांनी तलवारबाजी, दांडपट्टा आदींचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची आणि शौर्यगाथेची जिवंत झलक पहायला मिळाली.
---
बालकलाकारांचे कौतुक
आयुक्त यशवंत डांगे यांनी मर्दानी खेळ सादर करणाऱ्या बाल कलाकारांचे विशेष कौतुक केले. या लहान मुलांनी आपल्या कलेतून इतिहास जिवंत केला आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख होते, असे ते म्हणाले. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनीही आपल्या भाषणातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या विचारांचे स्मरण करून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com