

छत्रपती संभाजीनगर, ता. ३० ः यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि कला शाखेकडे अधिक असल्याचे चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार वाणिज्य शाखेच्या तुलनेत विज्ञान व कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवारपासून (ता. ३०) अंतिम विशेष फेरी सुरू झाली.
राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ५२ हजार ७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. १३ लाख ५२ हजार ६८२ जणांनी प्रवेश निश्चित केला. छत्रपती संभाजीनगर विभागातही मोठ्या संख्येने प्रवेश झाले. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या शाखानिहाय आकडेवारीनुसार, विज्ञान शाखेत ६ लाख ७९ हजार ४१३, वाणिज्य शाखेत ३ लाख १ हजार २५१, तर कला शाखेत ३ लाख ७२ हजार १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
---
उद्या यादी होणार प्रसिद्ध
नियमित तीन आणि सात विशेष फेऱ्यांनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता आठवी विशेष फेरी घेतली जात आहे. रविवारी दुपारी एकपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ ऑगस्टच्या सायंकाळी सहापर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरून लॉक करावा लागेल. यात दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे. महाविद्यालय वाटपाची यादी एक सप्टेंबरला दुपारी तीनला प्रसिद्ध होईल, तर दोन सप्टेंबर सायंकाळी सहापर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
---
विभागनिहाय प्रवेशाची स्थिती
मुंबई : ३ लाख १ हजार ३८४
पुणे : २ लाख ४२ हजार ४२२
छत्रपती संभाजीनगर : १ लाख ६६ हजार १३४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.