

दहिगावातील समाधान शिबिरातून
नागरिकांच्या समस्या निकाली
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १० : माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत शिबिर झाले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे एक हजार नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन नूतन जिल्हा परिषद सदस्या संस्कृती राम सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, प्रभारी तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार प्रवीण सुळ, माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा मोरे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेळके, सरपंच सोनम खिलारे, स्वाती महेश पाटील, रणधीर पाटील, सत्यशील पाटील, वंदना मोहिते, उपनिबंधक श्रीमती दीक्षित, तालुका कृषी अधिकारी, पुरवठा अधिकारी शेटे आदी उपस्थित होते. दहिगाव, गुरसाळे, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी, कुरुभावी, एकशिव, तांबेवाडी, पिरळे व कळंबोली या दहा गावांतील नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला. सातबारा दुरुस्ती, जिवंत सातबारा मोहीम, वारस नोंदी, महिलांच्या नावांची नोंद, रेशनकार्ड दुरुस्ती, मतदान ओळखपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजना तसेच विविध दाखले नागरिकांना देण्यात आले. प्रलंबित फेरफार प्रकरणेही निकाली काढण्यात आली.
बारा मंडलांत होणार शिबिर
या शिबिराचे आयोजन ग्राम महसूल अधिकारी समाधान पाटील यांनी केले. आभार मंडलाधिकारी सत्यवान घुगे यांनी मानले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर व संस्कृती सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील बारा मंडलांत तसेच नगरपंचायत व नगरपरिषदांमध्येही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.