Junnar : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर - किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

नगर पालिकेच्यावतीने आज गुरुवार ता. १८ रोजी पुतळ्याच्या चबूतऱ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पुतळ्याच्या पाया भरणीसाठी शिवप्रेमींनी किल्ले रायगड, रायरेश्वर, शिवनेरी व सातारा येथून आणलेली पवित्र माती व जल अर्पण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, समीर भगत, फिरोज पठाण, अविन फुलपगार, अक्षय मांडवे, सुनिल ढोबळे, अलका फुलपगार, अंकिता गोसावी, आश्विनी गवळी, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, सना मन्सूरी, हजरा इनामदार, भाऊ कुंभार, नरेंद्र तांबोळी तसेच वैभव मलठनकर, चंद्रकांत डोके उपस्थित होते.

हेही वाचा: साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वयीत

शिवनेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचलीग चौकात नगरपालिकेच्या वतीने २००१ मध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा अशी शिवभक्तांची गेली. अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यानुसार जुना पुतळा हलवून येथे नवीन पुतळा उभारण्यात येत असल्याचे पांडे यांनी सांगितले.

पुणे येथील खेडकर स्टुडिओत कलाकार निलेश खेडकर हा पुतळा तयार करत आहेत. या पुतळ्याची २८ लाख रुपये किंमत असून खालील चबुतरा बनविण्यासाठी २५ रुपये खर्च येणार आहे. पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून सर्व शासकीय परवानग्या मिळाल्या आहेत.

या पुतळ्याचे पावित्र्य जपण्याची,देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी जुन्नर नगर पालिकेची राहणार असल्याचे हमीपत्र जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. जुना पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार त्यांना विनामोबदला सुपूर्द केला आहे.

loading image
go to top