साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वयीत | Oxygen Plant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वयीत

साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वयीत

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा सहज उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व विवेक व्यासपीठ यांच्या माध्यमातून येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळच्या सानेगुरुजी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन ऑलस्टेट इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक चेतन गर्गा यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा: पुणे : विकास आराखड्यावरील हरकती व सूचनांबाबत तातडीने सुनावणी घ्या

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, सदस्य सिद्धार्थ गुजर, तनय केडियाल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राहुल मेहता, डॉ. सतीश कट्टीमनी, केदार मेथेकर, अक्षय शर्मा महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑलस्टेट इंडिया, युनायटेड वे ऑफ बंगळूरू व असोशिएटेड कोव्हिड टास्क फोर्स यांच्या सहकार्याने ५४ लाख रुपये खर्चून हा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रति मिनिटाला १२५ लिटर ऑक्सीजन निर्मिती होऊ शकते, अशी माहिती संस्थेचे सचिव श्री. गुजर यांनी दिली.

loading image
go to top