प्रशासनाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतो; चित्रा वाघ

प्रशासनाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतो. त्यामुळे पुढे काय होते हे पाहावे लागेल,’ असा टोला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लगावला.
Chitra Wagh
Chitra Waghsakal
Summary

प्रशासनाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतो. त्यामुळे पुढे काय होते हे पाहावे लागेल,’ असा टोला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लगावला.

पुणे - ‘महिला मुख्यमंत्र्याविषयी (Women Chief Minister) रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार, अशी माध्यमात चर्चा (Discussion) आहे. महिला मुख्यमंत्री झाल्यास अभिमान वाटेल पण तसे झाल्यास सर्व समस्या चुटकीसारख्या सुटणार नाहीत. कामाचा आवाका, प्रशासनाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री महाविकास आघाडीला चालतो. त्यामुळे पुढे काय होते हे पाहावे लागेल,’ असा टोला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Chitra Wagh
माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही; धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी वाघ म्हणाल्या, ‘लोकप्रतिनिधी महिलेविषयी काहीही बोलले व माफी मागितली की त्यांना सोडून दिले जाते. तसे न करता महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. मात्र, राज्य शासनाला त्यात स्वारस्य नाही. महिलांबद्दल काहीही बोलायचे आणि मग माफी मागत दिलगिरी व्यक्त करायची हा नवा ट्रेंड राज्यात सुरू झाला आहे. महिलांविषयी अपमानजनक वक्तव्यांबरोबरच शिवीगाळ करण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे कृत्य कोणी केल्यास त्याला माफ करणे योग्य नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. गुलाबराव पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता. मात्र, राज्य शासनाला त्यात स्वारस्य नाही. महिलांचे सक्षमीकरण हेच महिला आयोगाचे काम आहे. त्या अनुषंगाने बरीच कामे करता येतात. केवळ पोस्टर्स हटवून सर्व काही थांबणार नाही, असेही वाघ म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com