
एकूण १७ वॉर्डमधील सर्वेक्षणात ३,८७७ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. सद्यस्थितीला शहरात १७,३५० नागरिक असल्याचे आढळून आले.
जुन्नर : जुन्नरच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी कारवाईचा बडगा उगारताच दांडी बहाद्दर १८ शिक्षकांनी कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी उपस्थिती दाखविली.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सर्वेक्षणाला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपल्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये?अशी विचारणा केली. ही नोटीस हाती पडताच या शिक्षकांनी बुधवारपासून (ता.१५) सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. दांडी बहाद्दरांमध्ये १७ माध्यमिक आणि १ खासगी शाळेतील शिक्षकाचा समावेश असल्याचे मुख्याधिकारी तथा सनियंत्रण आधिकारी डॉ. जयश्री काटकर आणि आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री यांनी सांगितले.
- Coronavirus : ...तर ४ लाख जपानी नागरिकांचा होऊ शकतो मृत्यू!
पुण्याहून जुन्नर शहरात आलेल्या एका पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेने ७ तारखेनंतर येऊन देखील नगरपालिकेला याची माहिती दिली नसल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले. त्यांना होम क्वॉरंटाईनचा आदेश देण्यात आला आहे. ७ एप्रिलनंतर बाहेरगावाहून ८ नागरिक शहरात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मागील महिन्यातील सर्वेक्षणात जवळपास ३८५ नागरिक बाहेरगावाहून आले असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा होम क्वॉरंटाईन कालावधी संपलेला आहे.
- एक नंबर मुलांनो; मोदींनी केला व्हिडिओ शेअर...
एकूण १७ वॉर्डमधील सर्वेक्षणात ३,८७७ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. सद्यस्थितीला शहरात १७,३५० नागरिक असल्याचे आढळून आले. ७० वर्ष वयापुढील २,२९५ नागरिक आहेत. तर मधुमेह आणि रक्तदाबाचा ५१५ नागरिकांना त्रास असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे.