Coronavirus : ...तर ४ लाख जपानी नागरिकांचा होऊ शकतो मृत्यू!

Japan-PM-Shinzo-Abe
Japan-PM-Shinzo-Abe

टोकिओ : शिस्तप्रिय लोकांचा देश म्हणून ओळखला जाणारा जपानही आज कोरोनाशी दोन हात करत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली असताना नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमुळे जपान सरकारच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. कारण जर वेळीच पावले उचलली गेली नाही, तर ४ लाख जपानी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये वर्तविण्यात आली आहे. 

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने पंतप्रधान शिंजो आबे राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत जपानमध्ये ८६२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव बघता पंतप्रधान आबे यांनी टोकिओ, ओसाका आणि अन्य महत्त्ंवाचे ५ प्रांतांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. 

जपान सरकारच्या कायद्यांनुसार, आपत्कालीन परिस्थिती असतानाही कोणतीही कंपनी, कारखाना किंवा उद्योगधंदा बंद करण्याबाबत कोणतीही सक्ती करता येत नाही. तसेच काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम पॉलिसी सुरू केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात तेथे उद्योग सुरू आहेत. 

जपानमधील ज्या नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून येत आहेत, अशांचीच सध्या आरोग्य तपासणी केली जात आहे. काही सरकारी सूत्रांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जपानी माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच वेळीच पावले उचलली गेली नाही, तर जवळपास ४ लाख जपानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो, अशी शक्यताही वर्तविली आहे. 

या रिपोर्टमधील निष्कर्षानुसार, जपानमधील जवळपास ८ लाख ५० हजार लोकांसाठी व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. जपानमध्ये टोकिओ, ओसाका व्यतिरिक्त सैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका यांचाही समावेश आहे. कदाचित देशातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती शिंजो आबे सरकारला वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com