महिलेच्या प्रसंगावधानामुळे फसला अपहरणाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

पिंपरी  : महिलेच्या प्रसंगावधानामुळे थेरगाव येथील एका चिमुरड्याच्या अपहरणाचा एका इसमाचा प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. ऋषी असे त्या अडीच वर्षीय मुलाचे नाव आहे.
 
पिंपरी  : महिलेच्या प्रसंगावधानामुळे थेरगाव येथील एका चिमुरड्याच्या अपहरणाचा एका इसमाचा प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. ऋषी असे त्या अडीच वर्षीय मुलाचे नाव आहे.
 
त्याचे असे झाले की, पुरामध्ये घराचे नुकसान झाल्याने ऋषीची आई त्याला घेऊन कोल्हापूरहून थेरगावमधील आपल्या नातेवाइकांकडे रहायला आली आहे. सोमवारी सकाळी ऋषी खेळत खेळत घराबाहेरील रस्त्यावरून पुढे चालत गेला. आपण बरेच पुढे आल्याचे लक्षात आल्यानंतर तो रडू लागला. त्याचवेळी तेथे आलेल्या एका इसमाने हा आपलाच मुलगा असल्याचे सांगितले. मात्र, संशय आल्याने तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्याला पुराव्याची कागदपत्रे पोलिस ठाण्यात घेऊन ये, असे सांगितले. कागदपत्रे घेऊन येतो, असे सांगून गेलेला इसम पुन्हा आलाच नाही. त्यामुळे त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child kidnapping in thergaon