‘त्या’ मुलांसाठी पालकांची वणवण

प्रियंका तुपे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - बिहारच्या अरेरिया जिल्ह्यातील मझवा गावात मजुरी करून कुटुंबाचं पोट भरणारे महंमद इस्माईल वीस दिवसांपासून पुण्यात आले आहेत. कात्रजच्या मदरशात शिकणारी त्यांची दोन्ही मुले सध्या बालगृहात असून, या मुलांना घरी नेण्यासाठी ते सध्या वणवण भटकत आहेत. मात्र मुलांचा ताबा तर दूरच; पण त्यासाठी बालकल्याण समितीकडे केलेला अर्जही दाखल करून घेण्यात आलेला नाही, अशी खंत त्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. 

कात्रजमधील एका मदरशात शिकणारी दोन मुले लैंगिक शोषणामुळे जुलै महिन्यात पळून गेली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यावर पोलिस व बाल हक्क कार्यकर्त्यांनी या मदरशातून दयनीय अवस्थेत राहत असलेल्या जवळपास ३५ मुलांची सुटका केली होती.

बालकल्याण समितीने या मुलांचे समुपदेशन करून त्यांना बालगृहात 
दाखल केले. या मुलांना परत घेऊन जाण्यासाठी बिहारमधून त्यांचे पालक २०-२५ दिवसांपासून पुण्यात आले आहेत. या पालकांनी आधार कार्ड व ओळख पटवून देण्यासाठी आवश्‍यक इतर कागदपत्रेही बालकल्याण समितीपुढे सादर करण्याचा प्रयत्न केला; मात्र समितीने अजूनही मुलांचा ताबा दिला नसल्याने आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याचे पालकांनी सांगितले.

आम्ही सगळे हातावरचे पोट असलेले मजूर. मुलांना घेण्यासाठी कर्ज काढून इथपर्यंत आलो. इथे राहण्या-खाण्याची सोय नाही. जवळचे पैसेही आता संपले आहेत. बालकल्याण समितीने आमच्याकडे सर्व कागदपत्रे असूनही आम्हाला फक्त एकदा पाच मिनिटांसाठी मुलांना भेटू दिले.
- महंमद रिझवान, पालक

पुण्यातील बालकल्याण समितीच्या वतीने मुले पालकांच्या ताब्यात न देता पाटणा येथील बालकल्याण समितीकडे चार दिवसांत सोपवणार आहे, असे वारंवार सांगण्यात आले. प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. पाटणा येथे पाठविण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही अद्याप झालेले नाही.
- अझर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Child Madrasha Bihar Parents