शिक्रापूर : अल्पवयीन मुलीचा वयाच्या १६ वर्षीच विवाह लावून तो दोन्ही बाजूंच्या कुटुंबाने लपविला. पण याच मुलीला अपत्य होताना हा प्रकार रुग्णालयाच्या निदर्शनास आला. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांकडे धाव घेतली आणि सासर-माहेरच्या अशा दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.