चाइल्ड पॉनोग्राफी फॉरवर्ड करत असाल तर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पुणे : जगभरातील विविध वेबसाईटवरील चाइल्ड पॉनोग्राफीचे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे आता अडचणीत येणार आहेत. इंटरनेटवर केवळ चाइल्ड पॉनोग्राफी सर्च केले तरी तो पोस्को अंतर्गत गुन्हा असून या प्रकरणी पुण्यात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : जगभरातील विविध वेबसाईटवरील चाइल्ड पॉनोग्राफीचे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे आता अडचणीत येणार आहेत. इंटरनेटवर केवळ चाइल्ड पॉनोग्राफी सर्च केले तरी तो पोस्को अंतर्गत गुन्हा असून या प्रकरणी पुण्यात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सायबर पोलिस व्हिडिओंची तपासणी करीत आहे. त्यातून चार पोलिस ठाण्यांना संबंधित मोबाईलधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. चाइल्ड पॉनोग्राफीला देशात बंदी आहे. अशा हजारो व्हिडिओ क्‍लिप गुगलने काढून टाकल्या आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्‍सप्रोईटेड चिल्नस (एनईएमईसी) मार्फत गोपनीय टीप लाइन्स नंबर महासंचालकांना पाठविले आहे. त्यांच्याकडून ते पुणे पोलिसांना पाठविण्यात आल्या आहे. युएलआर लिंकचे असे 544 फोल्डर असून साधारण एका फोल्डरमध्ये सुमारे 55 बंदी असलेल्या क्‍लिप आहेत. सायबर पोलिस ठाण्यात सध्या त्यांची तपासणी सुरू आहे. या सर्व क्‍लिप 2019 या वर्षातील आहेत. त्यापैकी सुमारे 150 क्‍लिपची तपासणी पूर्ण झाली असून त्या ज्या मोबाईलवरून फॉरवर्ड करण्यात आला त्याची माहिती पोलिसांनी संबंधित मोबाईल कंपन्यांकडे मागितली आहे. वानवडीमधील एका लष्करी अधिका-यानेही असेच बंदी असलेल्या व्हिडिओ फॉरवर्ड केल्याचे तपासात पुढे आले आहे.

तर अटकही होणार
मोबाईल कंपन्यांकडून माहिती असल्यानंतर संबंधित मोबाईल धारकाची माहिती घेण्यात येईल. संबंधित व्यक्ती ज्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असेल त्या पोलिस ठाण्याला त्याची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर त्या मोबाईल धारकांचा शोध घेऊन त्याची चौकशी केली जाईल. त्याला हे व्हिडिओ कोठून प्राप्त झाले? ते व्हिडिओ त्याने का फॉरवर्ड केले? याची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर आवश्‍यकता असल्याच संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.

देशातील व्हिडिओ आढळले नाही
पुण्यातून अपलोड झालेले व्हिडिओ हे परदेशी साईटवरुन घेतलेले आहेत. आतापर्यंतच्या तपासात देशात चित्रित झालेला चाइल्ड पॉनोग्राफी व्हिडिओ आढळून आलेला नाही. अनेक व्हिडिओ नेपाळमधील असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोने पोलिस महासंचालकामार्फत पुणे सायबर पोलिसांना आतापर्यंत 544 चाइल्ड पॉनोग्राफी व्हिडिओची लिंक सोशल मिडियाद्वारे पाठविली आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे. संबंधितांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, सायबर क्राईम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Ponography Forwarding is Crime now

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: