खडकवासलाम : कात्रज जवळील गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडे नगर परिसरात सकाळी नऊ वाजता बेडरूमच्या खिडकीतून एक लहान मुलगी बाहेरच्या बाजूला अडकलेली अवस्थेत होती. योगेश चव्हाण यांनी धाव घेत. त्या मुलीचा जीव वाचवला..खोपडे नगर परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांची वेळ होती अचानक "लडकी गिर रही है!” असा आरडाओरडा करणारा आवाज कानावर पडला. त्या मुलीच्या बिल्डिंग पासून शंभर मीटरवर असलेल्या सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारे योगेश चव्हाण यांनी ऐकला आणि त्यांनी गॅलरीत येऊन पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक मुलगी बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकलेली दिसली. आणखी वेळ झाला असता तर ती मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्घटना घडली असती..साधारण शंभर फूट अंतरावर ही घटना घडत होती. वेळ न दवडता चव्हाण यांनी धाव घेतली. अंगावर फक्त बनियन आणि टॉवेल पण ते थांबले नाहीत. धावतच त्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर पोहोचले. पाहतात तर घराला कुलूप! घरात ती चिमुरडी एकटीच होती..दरम्यान, त्या मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून माघारी येत होती. “मी पोहोचलो, तेवढ्यात ती आईही आली. मी तिला परिस्थिती सांगितली आणि तिच्याकडून कुलपाची किल्ली घेतली. सुरक्षा दरवाजा, लॅच, मुख्य दरवाजा पटापट उघडले. बेडरूमला बाहेरून कडी होती ती उघडली आणि खिडकीत लटकलेल्या त्या मुलीला सुखरूपरीत्या घरात खेचून घेतलं,” असं योगेश चव्हाण यांनी इ सकाळशी बोलताना सांगत होते. .ही घटना काही क्षणात घडली होती. पण चव्हाण यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवून मुलीचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. आणि योगेश चव्हाण हे पुणे अग्निशामक दलातील अग्निशामक केंद्रात तांडेल म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, आज त्यांची आठवड्याची सुट्टी होती. त्यामुळे ते घरात होते. आंघोळ झाल्यानंतर पेपर वाचत बसले होते. त्यावेळी त्यांना लडकी की गिर रही है ऐसा आवाज आला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.