
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दत्त मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला एक मुलगा तोरण विक्री करत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले. त्यातील तीन ते चार कर्मचाऱ्यांनी मुलाच्या हातातील वस्तू हिसकावून घेतल्या, त्यानंतर संबंधित मुलास मारहाण करत त्याच्यावर कारवाई केली. या प्रकारामुळे घाबरलेला मुलगा रडत, गयावया करत कर्मचाऱ्यांना त्यास सोडण्यासाठी याचना करत होता, मात्र रडणाऱ्या मुलास ओढत घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ना त्याच्या अश्रूंशी देणे-घेणे होते...ना त्याच्या भुकेलेल्या पोटाशी!