esakal | यशस्वी विद्यार्थी घडविण्यात बालकल्याण संस्थेचा वाटा महत्त्वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

baba.jpeg

पुणे ः ""बालकल्याण ही संस्था समाजातील दिव्यांगांना घडविण्याचे आदर्श कार्य करत आहे. यशस्वी विद्यार्थी घडवण्यात संस्थेच्या सर्वांचाच महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष व संस्थेचे मानद सचिव प्रतापराव पवार यांनी केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या येथील बालकल्याण संस्थेला एसबीआय कॅपिटलच्या वतीने नुकतीच अत्याधुनिक बस भेट देण्यात आली. त्याप्रसंगी पवार बोलत होते. 

यशस्वी विद्यार्थी घडविण्यात बालकल्याण संस्थेचा वाटा महत्त्वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः ""बालकल्याण ही संस्था समाजातील दिव्यांगांना घडविण्याचे आदर्श कार्य करत आहे. यशस्वी विद्यार्थी घडवण्यात संस्थेच्या सर्वांचाच महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष व संस्थेचे मानद सचिव प्रतापराव पवार यांनी केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या येथील बालकल्याण संस्थेला एसबीआय कॅपिटलच्या वतीने नुकतीच अत्याधुनिक बस भेट देण्यात आली. त्याप्रसंगी पवार बोलत होते. 

या संस्थेला लागणारी मदत अनेक माध्यमांतून उपलब्ध होत असते, त्यातच एसबीआय कॅपिटलने दिलेली ही अत्याधुनिक बस दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे, असेही पवार यांनी सांगितले. 
या वेळी एसबीआय कॅपिटलचे कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, निवृत्त व्यवस्थापिका वर्षा पुरंदरे, विश्‍वस्त भारती पवार, ए. आर. वाळिंबे, डॉ. संजीव डोळे, डॉ. चारुलता बापये, संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे व संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

संस्थेतील मुलांची ने-आण करण्यासाठी मोफत बस सेवा पुरवली जाते. दिव्यांगाना बसमध्ये चढणे व उतरण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी खास लिफ्ट असलेली ही बस एसबीआय कॅपिटलने भेट दिली आहे. प्रतापराव पवार यांनी एसबीआय कॅपिटलचे कुट्टी व नेगी यांच्याकडून बसची चावी स्वीकारली. 
 
loading image
go to top