esakal | पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बालकांसाठी मोठा निर्णय! 
sakal

बोलून बातमी शोधा

anganvadi

अंगणवाड्यांमधील बालकांसाठी त्यांच्या घरीच पूरक पोषण आहाराचे साहित्य दिले जाणार आहे.  

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बालकांसाठी मोठा निर्णय! 

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : शालेय पोषण आहाराच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांसाठी त्यांच्या घरीच पूरक पोषण आहाराचे साहित्य दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदेला गुरुवारी विशेष परवानगी दिली. 

पुणे जिल्ह्यातील एक लाख पाच हजार बालकांना येत्या 30 जूनपर्यंतच्या पोषण आहाराचे साहित्य घरीच दिले जाणार आहे. यामध्ये तांदूळ, रवा, साखर, मटकी, तूरडाळ, तेल, तिखट आदी वस्तूंचा समावेश असेल. अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना याचा लाभ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासून अंगणवाड्या बंद आहेत. केवळ बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी अल्पकाळ त्या सुरू ठेवण्यात येत. परंतु, कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्यानंतर पूरक पोषण आहार वाटप बंद करण्यात आले.

अंगणवाड्यांमधील पोषण आहाराचे साहित्य बालकांच्या घरीच देण्याची परवानगी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे मागितली होती. त्यास राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो यांनी गुरुवारी मान्यता दिली. 

- जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या ः 4200 
- मिनी अंगणवाड्या ः 400 
- अंगणवाड्यांमधील बालकांची संख्या ः 1 लाख 5 हजार 

 

loading image
go to top