उतारवयाला बस स्थानकाचा आधार

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - ‘‘मुलांनी घरातून काढून टाकले. म्हणून एसटी स्टॅंडवर येऊन राहतो. माझ्यासारख्या कित्येक जणांना हा एसटी स्टॅंड आसरा बनला आहे. मुले सांभाळत नाहीत म्हणून फुटपाथवर राहावे लागते,’’ असे नेवासा येथून आलेले रामभाऊ शिंदे सांगत होते... त्यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी शिवाजीनगर एसटी स्थानकाचा आसरा शोधला आहे. प्रत्येकाचे दुःख मात्र एकच मुलांनी घरातून काढून टाकल्याचे. म्हणूनच या सर्वांनी आता एसटी स्थानकाजवळील पदपथाचा आसरा घेतला आहे.

शहरातील एका एसटी बस स्थानकाचे हे चित्र आहे. पुण्यातील प्रत्येक एसटी बस स्थानकावरील पदपथावर राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या सध्या वाढत आहे. सोलापूरच्या लता (नाव बदलले आहे) यांनी सून आणि मुलगा यांच्या त्रासाला कंटाळून तीन वर्षांपूर्वी घर सोडले आणि आज त्या शिवाजीनगर एसटी बस स्थानकाजवळील पदपथावर राहतात. 

किसन जाधव (नाव बदलले आहे) ७५ वर्षांचे आहेत. मुलांनी घरातून काढून टाकल्याने त्यांनी पुणे गाठले आणि पदपथावर राहायला सुरवात केली. आजारपणामुळे ते कुठेही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते पदपथावर दिवसभर झोपून असतात. ते म्हणतात, ‘‘घराबाहेर काढण्यापेक्षा उतारवयाचे जगणे समजून घेतले असते, तर आमच्यावर ही परिस्थिती ओढवली नसती.’’

माझे वय ८६ वर्षे आहे. माझ्या आजारपणामुळे कोणतेही काम होत नाही. काही दिवस मी वृद्धाश्रमात राहिलो. पण माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना येथे झाडू मारण्यासारखी कामे लावली जातात. वृद्धाश्रमात आम्हा ज्येष्ठांना आसरा मिळतो. मात्र आमच्याकडून काम होत नाहीत. म्हणून वृद्धाश्रमात राहायला नकोसे वाटते.
- रामभाऊ शिंदे, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Children do not care therefore stay on bus stop