मुलांनी अनुभवला 'टॉयमॅन' अरविंद गुप्तांनी घडवलेल्या खेळण्यांच्या दुनियेचा सफर 

The children experienced a journey into the world of toys created by Toyman Arvind Gupta
The children experienced a journey into the world of toys created by Toyman Arvind Gupta

पुणे : कागदापासूनची फुलपाखरे-पक्षी...काडीपेटी-दोऱ्यापासूनची आगगाडी...झाडाच्या पानांतून साकारलेला वाघ-सिंह...चप्पल-खराट्याच्या काड्यांपासूनचे सुदर्शन चक्र... पिंपळाच्या पानातून डोकावणारी मांजर...स्लीपर चपलातून निर्मिलेल्या गणितीय आकृत्या...अश्‍या गोष्टी प्रात्यक्षिकांतून दाखवत टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी साकारणारे संशोधक पद्मश्री अरविंद गुप्तांचा खेळण्यांच्या दुनियेत मुले चांगलीच भारावून गेली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील "खेल खेल में': टॉय अँड गेम डिझाईन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मुलांसाठी गुप्ता यांचे "खेळकर' तास ठेवण्यात आला होता. उदेघाटना प्रसंगी विद्या भवन, पुणेच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे, मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञान शोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे, उपसंचालक नेहा निरगुडकर, भारती बक्षी यांच्यासह विज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धीत पार पडला. 

गुप्ता म्हणाले, "मुलांचे लहानपण खेळण्यात गेले नाही, तर पुढे ती उपद्रवी बनतात. भवतालच्या प्रत्येक गोष्टीतून खेळणी बनवणे शक्‍य आहे, तसा विचार सर्वानी केला पाहिजे. दक्षिण भारतात नारळाच्या फांद्या, करवंट्यांपासून शेकडो खेळणी बनवली जातात. मुलांनी आपल्यातील कल्पक विचार प्रत्यक्षात उतरवून मजेशीर खेळणी बनवावीत त्यातूनच विज्ञान आत्मसात करावे'' 

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

मुलांमधील कल्पक-कलात्मक दृष्टीला चालना देऊन भारतीय बनावटीची खेळणी, गेम्स बनविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजिली असून याबाबतची सर्व माहिती kkm.exploratory.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com