
बालमेळ्याविषयी...
कधी - शनिवार, १६ नोव्हेंबर २०१९
कोठे - सीएम इंटरनॅशनल स्कूल, एसकेपी कॅम्पस, बालेवाडी.
केव्हा - सायंकाळी ५ ते ९
संपर्क - ८८०५००९३९५, ९०२११११४८३
पुणे - वर्गाबाहेरील शिक्षणाने मुलांची सामाजिक वाढ खूप चांगली होते. हेच शिक्षण मुलांना अधिक आनंद, उत्साह व समाजात जगण्याचे बळ देऊन जाते म्हणूनच मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित बाल दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ यंग बझ’ व ‘सीएम इंटरनॅशनल स्कूल’तर्फे बालमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १६) संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत हा बालमेळा होणार आहे.
लहान मुलांचे जग हे नवनवीन कल्पनांनी भरलेले असते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मुलांच्या मनात उत्सुकता असते. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक खेळ या मेळ्यामध्ये असतील. घोडेस्वारी, मातीची भांडी तयार करणे, टॅटू मेकिंग, बंजी रन, बंजी जंपिंग, बास्केट बॉल, बलून टॉय मेकर, रिंगटॉस, बॉल पूल, वॉल-क्लाइंबिंग, बझर गेम असे खेळ गेमझोनमध्ये असतील. मुलांच्या आवडीचे किडी आर्ट, नेल आर्ट व जादूगार, अँग्री बर्ड आदी अनेक निरनिराळे प्रकार पाहायला मिळणार आहेत. सोबत मुलांच्या आवडीच्या असंख्य प्रकारच्या पदार्थांची मेजवानी असणार आहे.