बालदिनानिमित्त आज मनोरंजनाचा बालमेळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कधी : गुरुवार, १४ नोव्हेंबर
कोठे : ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा-सासवड रस्ता, येवलेवाडी 
केव्हा : सायंकाळी ५ ते ८ 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५००९३९५, ९०२११११४८३ 
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण : ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल

पुणे - वर्गाबाहेरील शिक्षण मुलांना अधिक आनंद व उत्साह देऊन जाते. म्हणूनच, ‘मनोरंजनातून शिक्षण’ या संकल्पनेवर आधारित ‘सकाळ यंग बझ’ व ‘ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल’तर्फे गुरुवारी (ता. १४)  बालमेळावा आयोजित केला आहे. 

लहान मुलांचे जग हे अतिशय उत्साहाने आणि नवनवीन कल्पनांनी भरलेले असते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात कुतूहल असते. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक खेळ या मेळ्यामध्ये असतील.

घोडेसवारी, मातीची भांडी तयार करणे, टॅटू मेकिंग, बंजी रन, रिंगटॉस, बॉल पूल, वॉल क्‍लायंबिंग, असे खेळ गेम झोनमध्ये असतील. मुलांच्या आवडीचे किडी आर्ट, नेल आर्ट व जादूगार आदी अनेक प्रकार पाहायला मिळणार आहेत. सोबत मुलांच्या आवडीच्या असंख्य प्रकारच्या पदार्थांची मेजवानी असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Childrens day entertainment balmelava