Pune News : राष्ट्रपतींना स्नेहा म्हणाली, ‘मला आयपीएस व्हायचेय’; झेडपीच्या विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

बालदिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या ५१ विद्यार्थी आणि नऊ शिक्षक दिल्लीच्या शैक्षणिक दौऱ्यावर गेले आहेत.
president droupadi murmu and sneha jamhor

president droupadi murmu and sneha jamhor

sakal

Updated on: 

पुणे - ‘मोठेपणी तुला काय व्हायचे आहे?’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विचारलेल्या या प्रश्नावर मावळ तालुक्यातील उर्सेच्या जिल्हा परिषद शाळेतील स्नेहा जमहोर हिने क्षणाचाही विलंब न करता ‘मला आयपीएस व्हायचे आहे,’ असे आत्मविश्वासाने सांगितले. तिच्या या उत्तराचे राष्ट्रपतींनीही कौतुक केले. तर शिरूर तालुक्यातील कोयाळी पुनर्वसन शाळेच्या ऋग्वेद गायकवाड याने ‘तुम्ही पुन्हा विद्यार्थी झालात, तर काय शिकायला आवडेल?’ असा प्रश्न राष्ट्रपतींना विचारला. त्यावर आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती भवनातील हा संवाद विद्यार्थ्यांच्या दिल्लीतील शैक्षणिक दौऱ्याचा सर्वाधिक संस्मरणीय क्षण ठरला.

Loading content, please wait...